S M L

पवना धरणात 4 विद्यार्थी बुडाले

Samruddha Bhambure | Updated On: Mar 23, 2015 09:20 AM IST

पवना धरणात 4 विद्यार्थी बुडाले

22  मार्च :  मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात फिरायला गेलेल्या चार विद्यार्थी आज (रविवारी) दुपारी धरणात बुडाले. त्यापैकी एका विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अन्य तिघांचा शोध सुरू असल्याचे बचाव पथकाकडून सांगण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे इथील जेएसपीएम महाविद्यालयातील चार विद्यार्थी लोणावळ्या जवळच्या पवना धरण परिसरात फिरायला गेले होते. पोहण्यासाठी ते चौघे धरणाच्या पाण्यात उतरले होते. पोहताना चौघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी बचावकार्य होती घेतले. तसंच पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं असून, अन्य तीन विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2015 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close