S M L

आखाती वादळाची मुंबई-पुण्यात 'धुळ'वड

Samruddha Bhambure | Updated On: Apr 6, 2015 08:52 PM IST

आखाती वादळाची मुंबई-पुण्यात 'धुळ'वड

06 एप्रिल : थंडी, पाऊस, ऊन, गारपीट अशा बदलत्या हवामानाचा अनुभव घेतलेल्या मुंबईकरांच्या भेटीला रविवारपासून धूळ आली आहे. आखाती भागात धुळीचे मोठे वादळ आले असून अरबी समुद्र ओलांडून या वादळाचे वारे इथवर पोहोचले आहे. आज सोमवारीही त्याचा प्रभाव कायम आहे. पण या 'धुळवडी'चा स्थानिक हवामानावर परिणाम होणार नसल्याचे हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केले.

बुधवारी आखाती देशात आलेल्या वादळाने पूर्वेकडील देशांकडे आपला मोर्चा वळवला आणि रविवारी ते महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि इतर काही भागांत रविवारी सकाळपासूनच आभाळ धुळीत हरवलेले दिसत होते. मुंबईचं आभाळ आज पूर्णपणे धुळीत हरवलेलं दिसत आहे. पुणे जिल्ह्यात लोणावळा, मावळ, पिंपरी-चिंचवड परिसरातही सकाळपासून आकाशात धुळीचे लोट दिसत आहे. हवेत मोठ्या प्रमाणात धुळीचे कण पसरलेले असल्याने दाट धुक्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी समोर बघतानाही त्रास होत असून वाहनचालकांना तर या वातावरणाचा विशेष फटका बसत आहे. परिणामी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा महामार्ग तसंच हवाई वाहतुकीचाही काही प्रमाणात खोळंबा झाला.

दरम्यान, अशा प्रकारचे धुळीचे वादळ येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशी वादळे आलेली आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2015 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close