S M L

बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षांचा मुलगा ठार

Samruddha Bhambure | Updated On: Apr 17, 2015 02:00 PM IST

बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षांचा मुलगा ठार

17  एप्रिल : पुण्यातील जुन्नर जवळ खामुंडी गावाच्या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एक सहा वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला आहे, तर एक तीन वर्षांची मुलगी जखमी झाली आहे.

प्रविण दुजवडे असं या सहा वर्षाच्या मुलाचं नाव. सुट्टीनिमित्त आजोळी आलेल्या प्रविणवर बिबट्यानं हल्ला केला आणि त्याला गावापासून दूर नेऊन ठार मारलं. त्यांच्या नातेवाईकांना त्याचा मृतदेह झुडुपांमध्ये आढळला.

दरम्यान, या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने सापळे बसवले असून त्याला पकडण्यात वन विभागाला अद्याप यश आलेले नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2015 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close