S M L

पुणे विकास आराखड्याचीही मुंबईप्रमाणेच 'बाराखडी' !

Sachin Salve | Updated On: Apr 22, 2015 12:06 AM IST

पुणे विकास आराखड्याचीही मुंबईप्रमाणेच 'बाराखडी' !

pune dp plan21 एप्रिल : मुंबईच्या विकास आराखड्याचा वाद निव्वळला मात्र, पुण्याचा विकास आराखडासुद्धा वादात सापडलाय. हा आराखडा राज्य सरकारनं ताब्यात घेतलाय. मुंबईप्रमाणेच पुण्याचा विकास आराखडा रद्द व्हावा अशी मागणी, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केलीय. तर अंतिम टप्प्यात आलेला पुण्याचा आराखडा सरकारनं ताब्यात घेणं चुकीचं असल्याचं मत मनसेचे गटनेते राजेंद्र वागस्कर यांनी व्यक्त केलंय.

27 मार्चला राज्य शासनाने पुण्याचा विकास आराखडा ताब्यात घेतला. 7 एप्रिल हा विकास आराखडा सदर करण्याची शेवटची तारीख असताना अशा प्रकारे विकास आराखडा ताब्यात घेणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया पुणे महानगरपालिका पदाधिकार्‍यांनी दिली होती. फेब्रुवारी 2007 ला या विकास आराखड्याला सुरुवात झाली होती. 28 मार्च 2013 हरकती सुचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार 4 मे 2014 ला त्यावर सुनावणीही सुरुवात झाली. एकूण 87 जार हरकती नोंद्‌वल्याही गेल्या पण दिलेल्या कालावधीत विकास आराखडा सादर न झाल्याचं कारण देत शासनाने तो आपल्या ताब्यात घेतला. पुण्याचे भाजपचे आमदार मेधा कुलकर्णी यांनी याविषयीची लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली होती. यापूर्वी 1966 आणि 1987 मध्ये पुण्याचा विकास आराखडा शासनाने ताब्यात घेतला होता.

 पुणे विकास आराखड्याबाबत आतापर्यंत काय काय घडलं ?

-पुणे शहराच्या विकास आराखड्याची मुदत 1987 ते 2007 अशी होती. 2007 ला ही मुदत संपली तरी या आराखड्याचीच पूर्ण

अंमलबजावणी नाही.

- पुढचा आराखडा 2009 ते 2007 साठी तयार करण्यात आला. पण 2015 उजाडलं तरी अजुनही या आराखड्याला मंजुरी मिळु शकलेली नाही.

- या आराखड्यासंदर्भात पुणेकरांच्या 87 हजार हरकती

- या आराखड्यावर नगरसेवकांनी दिलेल्या 413 उपसुचनाही ठरल्या वादग्रस्त

-या आराखड्यावर सुनावणीसाठी समिती नेमण्यात आली होती. त्यांच्यासमोर या हरकतींवर सुनावणी.

या समितीने दोन अहवाल दिल्यामुळे गोंधळ

- लोकोपयोगी 45 आरक्षणं वगळल्याचा आरोप

- पुणे शहरामध्ये 3 एफएसआय द्यायचा की 4 यावरुन वाद

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2015 09:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close