S M L

छत्रपती साखर कारखान्यावर अजितदादांचं निर्विवाद वर्चस्व

Sachin Salve | Updated On: Apr 27, 2015 10:35 PM IST

छत्रपती साखर कारखान्यावर अजितदादांचं निर्विवाद वर्चस्व

24 एप्रिल : बारामतीमधील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. कारखान्याच्या 21 पैकी 21 जागा पवार यांच्या गटानं जिंकल्या. पवार गटानं पृथ्वीराज जाचक पॅनेलचा पराभव केलाय.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत धक्का बसल्यानंतर अजित पवार यांनी सोमेश्वर आणि छत्रपती कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. छत्रपती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात त्यांनी तब्बल 7 दिवस तळ ठोकला होता. तब्बल 17 जाहीर सभा त्यांनी घेतल्या होत्या. तसंच प्रत्येक वाडीवस्तीवर जाऊन सभासदांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. छत्रपती कारखान्याच्या सभासदांना मी वार्‍यावरच्या सोडणार नाही,सर्वांचे उसाचे गाळप केले जाईल. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मी हे सांगत नाही अन्यथा परत दारात आलो तर अजित पवारला उभं करू नका, असं आवाहन पवार यांनी केलं होतं. त्याला सभासदांनी कौल देत 21 च्या 21 जागा पवार यांच्या विजयी केल्या आहेत. छत्रपती कारखान्याची आज मतमोजणी झाली. या निवडणुकीत पवार यांना निर्विवाद वर्चस्व मिळाले असून त्यांनी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या पेनल चा पराभव केला आहे. अजित पवार राजकारणात सक्रीय झाले तेव्हापासून छत्रपती कारखान्यावर पवार यांचीच सत्ता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2015 08:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close