S M L

पुण्यात दोन माओवाद्यांना अटक, 7 दिवसांची पोलीस कोठडी

Sachin Salve | Updated On: May 9, 2015 04:35 PM IST

23naxal_india09 मे : सीपीआय (एम) या बंदी घातलेल्या संघटनेच्या के मुरलीधरन आणि सी पी इस्माइल या दोघा माओवाद्यांना एटीएस पथकाने अशुक्रवारी पहाटे तळेगाव दाभाडे इथून अटक करण्यात आली होती. आज पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने या दोन्ही माओवाद्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावाली आहे.

या दोघांपैकी के मुरलीधरन हा गेली 35 वर्षं माओवादी कारवायामध्ये सहभागी आहे. 62 वर्षांचा मुरलीधरन माओवाद्यांच्या दक्षिणेतील कारवायांचं नेतृत्व करतो. केरळ कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमध्ये माओवादी कारवाया घडवण्यात त्याची मुख्य भूमिका आहे. गेली अनेक वर्षे तो वॉन्टेड आहे. पुण्यात तो नाव बदलून राहत होता. अखेर एटीएसच्या पुणे शाखेने त्याला आणि त्याच्या साथीदारसह अटक करून मोठी कामगिरी बजावलीये.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2015 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close