S M L

मटक्यात हरल्यामुळे तरुणाची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: May 20, 2015 01:17 PM IST

मटक्यात हरल्यामुळे तरुणाची आत्महत्या

20 मे : पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात घोडेगावमध्ये मटक्यात हरल्यामुळे एका तरुणानं आत्महत्या केलीये.अमोल बोर्‍हाडे असं या तरुणाचा नाव आहे.  पण पोलिसांनी मात्र हा प्रकार दाबल्याचं या तरुणाच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

अमोलने आपली सगळी पुंजी मटक्यात घालवली. जमीन विकून मिळालेला पैसा गमावल्यानं त्यानं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. पण पोलीस मात्र या गावात मटका सुरुच नाही असा दावा करत आहे. तर इथे गावोगाव मटक्याचे अड्डे राजरोजपणे सुरू असल्याचं याचबद्दल IBN लोकमतचे रिपोर्टर रायचंद शिंदे यांनी तिथे जाऊन घेतलेल्या आढाव्यातून स्पष्ट होतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2015 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close