S M L

पिंपरीत रस्त्याच्या वादावरून गावकरी -पोलिसांत धुमश्चक्री

Sachin Salve | Updated On: May 21, 2015 04:04 PM IST

पिंपरीत रस्त्याच्या वादावरून गावकरी -पोलिसांत धुमश्चक्री

pimpri 34534521 मे : पिंपरी-चिंचवडमधल्या बोपखेल गावात ग्रामस्थांच्या रहदारीसाठी असलेला हा रस्ता बंद केल्यानं गावकरी आणि लष्करात वाद सुरू आहे. आज (गुरुवारी) हा वाद आणखी चिघळला. ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडले पण या आंदोलनाचा हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. या धुमश्चक्रीत 2 पोलीस आणि 4 नागरिक जखमी झाले.

बोपखेल येथे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रस्त्यावरून हा वाद सुरू आहे. न्यायालयाने निर्णय दिल्याचा दाखला देऊन रहदारीसाठी रस्ता बंद केल्याची नोटीस लष्करानं लावली होती. पूर्वसूचना न देता अचानक रस्ता बंद झाल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. याविरोधात गावकर्‍यांनी वेळोवेळी आवाज उठवला. पण उपयोग होत नाही त्यामुळे आज पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पण, या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. गावकर्‍यांनी पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. तब्बल पाच तास पोलीस आणि गावकर्‍यांमध्ये संघर्ष सुरू होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2015 04:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close