S M L

टोलबंदीमुळे पुणेकर सुखावले !

Sachin Salve | Updated On: May 30, 2015 02:13 PM IST

टोलबंदीमुळे पुणेकर सुखावले !

30 मे : टोलबंदीसाठी सरकारनं अधिसूचना जारी केलीये. त्यामुळे 12 टोल नाके येत्या 1 जूनपासून बंद होणार आहे. राज्य टोल मुक्त करण्याच्या दृष्टीने सरकारने केलेल्या घोषणेमुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. 12 टोलनाके आणि 53 नाक्यांवर सूट मिळत असल्यामुळे पुणेकरांनी सुटकेचा श्वास सोडलाय.

कायम स्वरूपी बंद केल्या जाणार्‍या 12 टोल नाक्यामध्ये पुणे जिल्ह्यातील वडगाव-चाकण -शिक्रापूर रोड वरील शिक्रापूर टोल आणि वडगाव -चाकन -शिक्रापूर रस्त्यावरील भंडारा डोंगर नाका कायम स्वरूपी बंद होणार आहेत तर ज्या 53 टोल नाक्यावर वाहनाना सूट दिल्या जाणार आहे. त्यामध्ये ही पुणे जिल्ह्यातील पुणे शिरूर अहमद नगर रस्त्यावरील-म्हसने टोल,दौंड -रेल्वे ओवरब्रिज कडेगाव भिगवन -आणि नीरा बारामती रस्त्यावरील टोलचा समावेश आहे. मात्र, हे सगळे टोल बंद करत असतांना टोल चालवणार्‍या ठेकेदाराना राज्य सरकार टेंडर पेक्षा अधिक रक्कम देत असल्याचा आरोप केला जातोय आणि त्यामुळे हे टोल बंद करून ही एक प्रकारे सामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याच बोललं जातंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2015 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close