S M L

पुण्यात दांडेकर पुलाजवळ दोन गटात तुंबळ हाणामारी

Sachin Salve | Updated On: Jun 4, 2015 10:48 AM IST

पुण्यात दांडेकर पुलाजवळ दोन गटात तुंबळ हाणामारी

pune dandekar bridg04 जून : पुण्यातील दांडेकर पुलाजवळ मध्यरात्री दोन गटांत तुफान मारामारी झाली. या मारामारीत 7 ते 8 गाड्यांचं नुकसान झालंय. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आलंय. या चौघांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दांडेकर पुलाजवळील असलेल्या वस्तीतील दोन गटांत जुन्या वादावरून भांडणं झाली आणि त्यांचं रूपांतर मारामारीत झालं. दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. यातील काहींनी दारू पिऊन रस्त्यांवर धिंगाणाही घातला.

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये या लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला असून यातील चौघांना ताब्यातही घेण्यात आले आहे. दोन गटाच्या राड्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2015 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close