S M L

शीख बांधव राज्यात एकरूप होऊन राहतात - राज ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Jun 10, 2015 05:09 PM IST

शीख बांधव राज्यात एकरूप होऊन राहतात - राज ठाकरे

09 जून : प्रत्येकाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगलाच पाहिजे. पण, जिथे जाल तिथली संस्कृती आत्मसात केली पाहिजे. शीख बांधव वर्षानुवर्ष राज्यात एकरुप होऊन राहता. त्यांनी इथे येऊन स्वत:चे मतदारसंघ तयार केलं नाहीत, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी शीख बांधवांचे कौतुक केलं.

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांना आज (बुधवारी) सरहद संस्थेतर्फे 'संत नामदेव' पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संत नामदेवांनी पंजाबमध्ये केलेल्या कार्याचा उल्लेख करताना एक शिंपीच धागा जोडण्याचे काम करू शकतो, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पावसाळ्याच्या तोंडावर 'बादल' महाराष्ट्रात आले आहेत, हा अनोखा योगायोग असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी आता तरी राज्यातील दुष्काळ दूर होवो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माझा कोणत्याही राज्याला विरोध नाही. तुम्ही आम्हाला मान द्या, आम्ही तुम्हाला मान देऊ, असेच माझे विचार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, यावेळी बोलताना संत नामदेव यांनी 20 वर्षांपेक्षा अधिक काळ पंजाबमध्ये घालवला, याचा आम्हाला अभिमान आहे, असं प्रकाशसिंग बादल म्हणालेत. तर घुमानमध्ये झालेल्या साहित्य संमेलनासाठी बादल यांनी आणि पंजाब सरकारने दिलेल्या सहकार्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केलं. संमेलनाच्या तयारीवर बादल स्वत: लक्ष ठेऊन होते. त्यांनी त्यासाठी खूप कष्ट घेतले, असं फडणवीस म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 10, 2015 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close