S M L

FTII मध्ये 'महाभारत', चौहानांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांचा विरोध

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2015 08:16 PM IST

FTII मध्ये 'महाभारत', चौहानांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांचा विरोध

ftii pune313 जून : राष्ट्रीय फिल्म आणि टेलीव्हिजन संस्थेमध्ये संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे 'महाभारत' रंगलंय. गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केलाय. गजेंद्र चौहान भाजप कार्यकर्ते आहेत आणि शैक्षणिक संस्थांच्या ठिकाणी राजकीय व्यक्ती नकोत, अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे.

गजेंद्र चौहान यांनी दूरदर्शनच्या महाभारत मालिकेत युधिष्ठिराची भूमिका केली होती. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलन तीव्र करायला सुरुवात केली आहे. प्रॅक्टीकल्स थांबवलेली आहेत, वर्गामध्येही हजेरी लावणार नाही असंही जाहीर केलंय. एकाप्रकारे विद्यार्थ्यांनी बेमुदत संपच पुकारला आहे. FTII च्या आवारात होत असलेले इतर कार्यक्रमही बंद पाडण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतायत. प्रभात पुरस्कारांच्या वितरणाचा कार्यक्रमही आज विद्यार्थ्यांनी बंद पाडला. अभिनेते सचिन खेडेकर, मोहन आगाशे असे मातब्बर या सोहळ्याला उपस्थित होते.

दरम्यान, आपल्यावर होणार्‍या टीकेला गजेंद्र चौहान यांनी उत्तर दिलंय. मी सिनेमाक्षेत्राशी संबंधित माणूस आहे. मी, FTII मध्ये करणार असलेलं काम पाहून मगच वाटलं तर माझा विरोध करा असं चौहान यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2015 08:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close