S M L

ऊस दरप्रश्नी राजू शेट्टींचा एल्गार

Sachin Salve | Updated On: Jun 22, 2015 08:43 PM IST

ऊस दरप्रश्नी राजू शेट्टींचा एल्गार

raju shetty_sambal andolan22 जून : ऊस प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. उसाला एफआरपीप्रमाणं दर द्यावा यासाठी पुण्यात साखर संकुलाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं संबळ आंदोलन सुरू केलंय.

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. 30 जूनपूर्वी साखर कारखान्यांनी एफआरपीचे पैसे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना चुकते करावेत अशी प्रमुख मागणी राजू शेट्टींनी केलीये. यावेळी राजू शेट्टी आणि सदाभाऊंनी संबळ वाजून निषेध व्यक्त केलाय.

विशेष म्हणजे, मागील शनिवारी ऊस संकुलात झालेल्या कार्यक्रमात राजू शेट्टींनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसेंकडे एफआरपीबाबत मागणी केली होती. खडसे आणि चंद्रकांत पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मदत देण्याबाबत आश्वासन दिलं होतं. त्यामुळे राजू शेट्टी आंदोलन पुढे ढकलतील अशी शक्यता होती. मात्र, राजू शेट्टी यांनी आश्वासनाला केराची टोपली दाखवत ठिय्या आंदोलन सुरू केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2015 08:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close