S M L

दाभोलकरांचे मारेकरी माहीत असूनही पोलीस गप्प -शैला दाभोलकर

Samruddha Bhambure | Updated On: Jul 2, 2015 03:14 PM IST

दाभोलकरांचे मारेकरी माहीत असूनही पोलीस गप्प -शैला दाभोलकर

02 जुलै : डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी कोण आहेत ते पोलिसांना माहिती, पण कोणाच्यातरी दहशतीखाली येऊन पोलीस गप्प बसलेत असा आरोप शैला दाभोलकर यांनी केलाय.

दाभोलकरांच्या हत्येला जवळपास दोन वर्षं पूर्ण होतायत. पण, त्यांचे मारेकरी अजूनही मोकाटच आहेत. डॉ. दाभोलकरांचा वारसा अंधश्रद्धा निर्मुलन समिती पुढे चालवतेय. त्याचाच एक भाग म्हणून 'अंनिस'तर्फे आज विज्ञान वाहिनीमार्फत फिरत्या तारांगणाचं लोकार्पण करण्यात आलं. डॉ. दाभोलकरांची हत्या पुण्यात ज्याठिकाणी झाली त्याच ठिकाणी या तारांगणाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी शैला दाभोलकर यांनी पोलीस दलावर आरोप केलाय. "भारतात खूप चांगली पोलीस यंत्रणा आहे. त्याआर्थी इथल्या पोलिसांना हे नक्की समजलं असणार की मारेकरी कोण आहे. पण कसल्यातरी दहशतवादाचं कसलं तरी सावट आलेलं आहे, ज्याच्यामुळे पोलीसपुढे येऊन सांगत नाहियेत, असं आरोप शैला दाभोलकरांनी केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2015 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close