S M L

यंदाचं विश्व मराठी साहित्य संमेलन अंदमानात

Samruddha Bhambure | Updated On: Jul 2, 2015 09:07 PM IST

यंदाचं विश्व मराठी साहित्य संमेलन अंदमानात

02 जुलै : वारंवार वादाच्या भौवर्‍यात सापडलेलं विश्व मराठी साहित्य संमेलन यंदा ऑक्टोबरमध्ये अंदमानमध्ये होणार आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य यांनी पुण्यात याची घोषणा केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचं औचित्य साधून हे संमेलन त्यांना समर्पित करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या संमेलनाच्या आर्थिक मदतीसाठी आम्ही कुणापुढे हात पसरणार नाही, या संमेलनासाठी कुणाची मदत घेणार नाही. पण, कुणी मदत केली; तर ती जरूर स्वीकारली जाईल, असंही माधवी वैद्य यांनी सांगितलंय. पण मुख्य संमेलनाबाबत या बैठकीत काहीही चर्चा झाली नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2015 09:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close