S M L

पुण्यात मंडईमधल्या शारदा गणपती मंदिरातून 50 तोळ्यांचे दागिने लंपास

Samruddha Bhambure | Updated On: Jul 8, 2015 02:08 PM IST

पुण्यात मंडईमधल्या शारदा गणपती मंदिरातून 50 तोळ्यांचे दागिने लंपास

08 जुलै : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींपैकी एक असलेल्या मंडईच्या शारदा गणपती मंदिरा चोरी झाली आहे. या चोरट्यानी तब्बल 50 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महत्वाचं म्हणजे ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पहाटे साडेपाच वाजता ही चोरी झाल्याचा आंदाज आहे. एका अज्ञात व्यक्तीनं मंदिराच्या काचेचा बॉक्स फोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर गणपतीच्या अंगावरील सोन्याचे 50 तोळे वजनाचे दागिने चोरून पोबारा केला. पहाटे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना गणपतीच्या अंगावरील दागिने गायब असल्याचे निदर्शनास आलं. मंडईचा हा अगदी गजबजलेला परिसर आहे .या मंदिराच्या बाजूलाच मंडई आहे, त्यामुळे अगदी पहाटेपासून इथं वर्दळ सुरु असते.

याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपासाला सुरूवात करण्यात आले आहे. मंदिराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2015 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close