S M L

राज्यात 51 हजार नव्हे तर 11 लाख विद्यार्थी शाळाबाह्य, स्वयंसेवी संस्थांचा दावा

Sachin Salve | Updated On: Jul 10, 2015 05:13 PM IST

राज्यात 51 हजार नव्हे तर 11 लाख विद्यार्थी शाळाबाह्य, स्वयंसेवी संस्थांचा दावा

10 जुलै : शिक्षण विभागाकडून चार जुलैला करण्यात आलेला शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे हा सामान्य नागरिकांची दिशाभूल करणारा आहे, असा दावा पुण्यातील काही स्वयंसेवी संस्थानी केला आहे. या सर्वेक्षणात राज्यात जवळपास 51 हजार शाळाबाह्य विद्यार्थी असल्याचा आकडा सांगण्यात आलाय. मात्र वस्तुस्थिती संपूर्ण वेगळी आहे. राज्यात जवळपास 11 लाख शाळाबाह्य विद्यार्थी आहेत त्यामुळे सरकारनं हा सर्व्हे रद्द करावा, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केलीय.

सर्वेक्षण चुकीच्या वेळी करण्यात आल्याने शिक्षण विभागाचा हा आकडा शाळाबाह्य विद्यार्थ्यावर अन्याय आणि अवमान करणारा आहे, असा दावा शांतीवन स्वयंसेवी संस्थेनं केलाय. सर्वेक्षण करताना ऊसतोड कामगार, खाण कामगार, वीटभट्टीकामगार, बांधकाम कामगार, लोककलावंत आणि भटक्या जमातीतील मुलांची योग्य नोंद करण्यात आली नाही, असं स्वयंसेवी संस्थेचं म्हणणं आहे. हा सर्वेक्षण रद्द करून नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात शाळाबाह्य विद्यार्थ्याचा सर्वेक्षण करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलीय.

शालाबाह्य सर्व्हेवरचे आक्षेप

- राज्यातील इतर भागातून हंगामी स्थलांतर होणार्‍या मुलांची नांेद नाही

- हा सर्व्हे ऑगस्टमध्ये करणं अपेक्षित होतं

- एकट्या बीड जिल्ह्यात 80 हजारांवर शाळाबाह्य विद्यार्थी

- सर्व्हे त्रयस्त यंत्रणेमार्फत करायला हवा होता

- सर्व्हे करणारी यंत्रणा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली नाही

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2015 05:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close