S M L

गजेंद्र चौहान यांनी स्वत:हून पायउतार व्हावं-ऋषी कपूर

Sachin Salve | Updated On: Jul 10, 2015 07:37 PM IST

गजेंद्र चौहान यांनी स्वत:हून पायउतार व्हावं-ऋषी कपूर

10 जुलै : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना बॉलिवूडमधून मिळणार्‍या पाठिंब्यामध्ये वाढ होताना दिसतेय, त्यामध्ये आता अभिनेते ऋषी कपूर यांची भर पडली आहे. एफटीआयआयच्या संचालकपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यास ऋषी कपूर यांनी विरोध केलाय. विद्यार्थ्यांना नको असेल तर गजेंद्र चौहान यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा असं ऋषी कपूर यांनी सुचवलंय

. भाजपच्या जवळचे मानले जाणारे अनुपम खेर यांनीही ट्विट करून चौहान यांची एफटीआयआयच्या संचालकपदी बसण्याची पात्रता नसल्याचं म्हटलं होतं. कालच अभिनेता रणबीर कपूरनेही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. एफटीआयआयच्या अध्यक्षपदी प्रेरणादायी व्यक्ती असावा अशी सुचना रणबीरने केली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2015 07:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close