S M L

उद्धव ठाकरेंचा फैसला, फडणवीस सरकारचा तो शेवटचा दिवस ठरेल -अजित पवार

Sachin Salve | Updated On: Jul 11, 2015 09:37 PM IST

ajit_pawar_vs_cmfadanvis11 जुलै : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेकडे स्वाभिमान नाही. जर सेनेनं स्वाभिमान दाखवून सत्तेतून बाहेर पडून दाखवलं तर मध्यावधी निवडणुका होतील असं भाकित वर्तवलं होतं. आता त्यांचे पुतणे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या विधानाची रेघ ओढलीये.जर उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला तर तो फडणवीस सरकारचा शेवटचा दिवस असेल असा अंदाज व्यक्त केलाय.

पुण्यात आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. पुण्यासारख्या शांत शहरातही दंगलीचे प्रकार घडतायत हे या सरकारचं अपयश आहे. ह्या सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणंही ठळकपणे समोर येतायत अशी टीका अजित पवारांनी केली. यावेळी पत्रकारांनी शरद पवारांनी काल सेनेवर टीका केली होती. त्याबद्दल विचारले असता. अजित पवार म्हणाले, शरद पवारांच्या विधानात काहीही चुकीचे नाही. ते जे म्हणाले ते खरं आहे. माझं असं मत आहे की, या सरकारला एकतर पूर्ण बहुमत नाही. शिवसेनेच्या नेत्यांची विधान असो किंवा 'सामना'मधून टीका ही वेगवेगळ्या प्रकारची येत आहे. त्यामुळे ते काही समाधानी आहे असं दिसत नाही. आणि असं असताना उद्धव ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेतला तर तो या सरकारचा वेगळा दिवस असेल असं भाकित पवारांनी व्यक्त केलं.

पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार

येत्या पावसाळी अधिवेशनातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभागृहात सरकारला शेतकर्‍यांच्या प्रश्नावर वर इतर अनेक समस्यांवर जाब विचारणार आहे.काँग्रेसची आणि आमची भूमिका खूप वेगळी आहे. त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलनं केली ही त्यांची भूमिका आहे. पहिले 6 महिने आम्ही या नवीन सरकारला सावरायला वेळ दिला. लवकरच आमची यासंदर्भात भूमिका ठरणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2015 07:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close