S M L

नाईलाजाने सत्तेत सामील -संजय राऊत

Sachin Salve | Updated On: Jul 14, 2015 12:40 PM IST

sanjay_raut314 जुलै : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वादावर आता शिवसेना नेत्यांनी उघड -उघड पणे बोलायला सुरुवात केलीय. महाराष्ट्राची गरज आहे म्हणून आम्ही "नाईलाजाने "सत्तेमध्ये सामिल असल्याचं धक्कादायक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय.

पिंपरी चिंचवडमध्ये एका पुरस्कार समारंभासाठी संजय राऊत आले होते, त्यावेळी बोलतांना राऊत यांनी भाजपवर चौफेर हल्ला चढवला. राज्यात झालेल सत्तांतर हे कुठल्या लाटे मुळे नाही तर शेतकर्‍यांचा 7- 12 कोरा करून देणार, या शिवसेनेन दिलेल्या आश्वासनामुळे झाल्याचं राऊत म्हणाले.

तसंच सरकारमधील रोज-रोज समोर येणार्‍या घोटाळ्यांचा जाब आम्हालाही विचारला जातो आणि म्हणून सरकारने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अस वागू नये, असा घरचा आहेर वजा सल्ला द्यायलाही, राऊत विसरले नाहीत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2015 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close