S M L

'एफटीआयआय'च्या आंदोलक विद्यार्थ्यांना सलमान खानचा पाठिंबा

Samruddha Bhambure | Updated On: Jul 16, 2015 10:35 PM IST

989salman_khan16 जुलै : 'फिल्म अण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया'च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या बॉलीवूडकरांमध्ये प्रसिद्ध अभिनेता सलमान खान देखील सामील झाला आहे. गजेंद्र चौहान यांनी स्वत:हून पायउतार व्हावं, अशी भूमिका सलमान खाननं मांडली आहे.

गेल्या महिनाभरापासून एफटीआयआयचे विद्यार्थी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्ती विरोधात आंदोलन करत आहेत. चौहान यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणं ऐकावं कारण, या इंडस्ट्रीला विद्यार्थ्यांनी घडवलं आहे, असं सलमान माध्यमांशी बोलताना म्हणाला. यापूर्वी ऋषि कपूर, रणबीर कपूर, अनुपम खैर, राजकुमार राव, पियुष मिश्रा या बॉलीवूडकरांनी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2015 10:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close