S M L

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे 10 दिवस राहणार बंद ?

Sachin Salve | Updated On: Jul 22, 2015 06:56 PM IST

mumbai pune express21 जुलै : मुंबई-पुणे शहरांना सुपरफास्ट जोडाणार एक्स्प्रेस वे तब्बल 10 दिवस बंद राहणार अशी माहिती सूत्रांनी दिलीये. उद्या म्हणजेच 22 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हायवे बंद राहणार असल्याचं कळतंय. त्याचबरोबर जुना मुंबई हायवेही बंद राहणार आहे. मात्र, पूर्ण एक्स्प्रेस वे बंद ठेवणार नसल्याचा दावा एमएसआरडीसीनं केलाय.

दोन दिवसांपूर्वी आडोशी बोगद्यासमोर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे तब्बल 13 तास थांबला होता. दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. विशेष म्हणजे दर पावसाळ्याला खंडाळा घाटाजवळ दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. पण, रविवारी झालेल्या अपघातामुळे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळेच आता एक्स्प्रेस वेवर दुरस्तीसाठी दहा दिवस एक्स्प्रेस वे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. या काळात ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे, तिथे दुरस्ती केली जाणार आहे. त्यामुळे पर्यायी असलेला जुना मुंबई-पुणे हायवेही बंद राहणार आहे. पण, असं जर झालं तर मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई मार्ग पूर्णपणे बंद होईल. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होणार हे स्पष्ट आहे. मात्र, एमएसआरडीसीने पूर्ण एक्स्प्रेस वे बंद राहणार नाही असं स्पष्ट केलंय. फक्त एक लेन बंद करण्यात येणार आहे. वीकेंड्स म्हणजे शनिवार आणि रविवारच्या दिवशी एक्स्प्रेस वेवर दोन्ही महामार्गावर वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे असंही सांगण्यात आलंय.

एक्स्प्रेस वे 10 दिवस बंद ?

- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे 10 दिवस बंद

- सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद

- जुना मुंबई-पुणे हायवेही ठेवणार बंद

- 22 जुलै ते 3 ऑगस्टमध्ये 10 दिवस बंद

- वीकेंड्सना सुरू असणार दोन्ही महामार्ग

- दोन्ही महामार्गांवर होणार दुरुस्तीची कामं

- दगड काढण्यापुरती एक लेन ठेवणार बंद - एमएसआरडीसी

- पूर्ण एक्स्प्रेस-वे बंद ठेवणार नसल्याचा दावा

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2015 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close