S M L

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उद्यापासून दुरुस्ती

Samruddha Bhambure | Updated On: Jul 22, 2015 04:16 PM IST

sdafawetwt

22 जुलै : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या दुरूस्तीचे काम उद्यापासून (गुरूवार) सुरू करण्यात येणार असून यावेळी एक्स्प्रेसवे पूर्णपणे बंद न करता आठवडाभरात हे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी आज (बुधवारी) स्वत: एक्स्प्रेस वेवर जाऊन या पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तज्ज्ञांचा ताफा होता.

सतत कोसळणार्‍या दरडीनंतर आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या दुरुस्तीबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. लहान वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर जड वाहनांना एक्स्प्रेस वेवरूनच वाहतूक करावी लागेल. जेवढा वेळ दुरुस्तीचं काम सुरू असेल तेवढा वेळ जड वाहनांची वाहतूक बंद असेल.

गेल्या रविवारी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून 2 जण ठार झाले होते. त्यानंतर एक्स्प्रेस वेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सततच्या कोसळत्या दरडींमुळे हायवेचा प्रवास धोकादायक बनत आहे. त्यामुळे अखेर या प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

दरम्यान रविवारी झालेल्या अपघातासाठी आयआरबीकडून नुकसान भरपाई घ्यावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. चौकशीअंती यावर निर्णय घेऊ, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या अपघाताची चौकशी करणार असल्याचंही एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

घाट परिसरात एक्स्प्रेस वे अनेक ठिकाणी धोकादायक बनला आहे. दरडी कोसळयाच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. एक्स्प्रेस वेवर सात ते आठ ठिकाणी सुरक्षा जाळया लावण्याची गरज असून, उद्यापासून (गुरूवार) महामार्गाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. खोपोली जवळच्या ओडोशी बोगद्याशेजारच्या रस्त्यापासून दुरूस्ती कामाला सुरूवात होईल. कमी रहादारीच्यावेळी हे दुरूस्तीचं काम करण्यात येईल. तसंच एक्स्प्रेसवे पूर्णपणे बंद न करता हे काम करण्यात येईल. दुरूस्तीचे काम सुरू असताना हलक्या वाहनांना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2015 02:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close