S M L

चिंचवडमध्ये दोन मांडूळ तस्करांना अटक

Sachin Salve | Updated On: Jul 22, 2015 06:06 PM IST

चिंचवडमध्ये दोन मांडूळ तस्करांना अटक

22 जुलै : मांडूळाची तस्करी करण्यासाठी चिंचवडमध्ये आलेल्या दोन तस्करांना पोलिसांनी अटक केलीये. सोमवारी रात्री वाल्हेकरवाडी परिसरात चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली. स्वप्नील मुरलीधर माने आणि नवनाथ किसन ठाकर अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दोन तरुण मांडूळाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला आणि कापडी पिशवी घेऊन फिरणार्‍या दोन संशयित तरुणांना अटक केली. त्यांच्याकडे झडती घेतली असता पिशव्यांमध्ये दोन जिवंत मांडूळ आढळून आले. पोलिसी खाक्या दाखवताच 4 लाख रुपयांना मांडूळांची तस्करी करणार असल्याचे त्यांनी कबूल केले. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2015 06:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close