S M L

झुंज संपली, धनश्री दिवेकरचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jul 23, 2015 07:44 PM IST

aruaehurheuay23 जुलै : धोंडे जेवणाच्या वेळी अंगठी, गाडी दिली नाही म्हणून सासरच्या लोकांनी पेटवून दिलेल्या धनश्री दिवेकरची मृत्यूशी झुंज अखेर संपली. गेल्या दोन आठवड्यांपासून उपचार सुरू असताना आज धनश्रीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती, सासू-सासर्‍यांना पोलिसांनी अगोदरच अटक केलीये. पण, हवाशापोट्या निष्पाप धनश्रीला मात्र प्राणाला मुकावले लागले.

पुण्यातील दौंडमधल्या वरवंड इथं अधिक महिन्यात धोंडे जेवणाच्या वेळी जावयाची मानपानाची मागणी पूर्ण केली नाही म्हणून धनश्री दिवेकर हिला सासरच्यांनी पेटवून दिलं होतं. यात ती 85 टक्के भाजली होती. तिच्यावर पुण्यातल्या सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. अखेर आज तिचं निधन झालं. धनश्री उच्चशिक्षित होती. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये ती लेक्चरर होती. अधिक महिन्यानिमित्त अंगठी, लॉकेट आणि गाडीची मागणी धनश्रीच्या सासरच्यांनी केली होती. पण ती पूर्ण न झाल्याने सासू-सासरा आणि नवर्‍याने धनश्रीला पेटवून दिलं होतं. तिच्या पार्थिवावर तिच्या माहेरीच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2015 07:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close