S M L

पुण्यात पुन्हा ढोल पथक विरुद्ध पोलीस, 4 पथकांवर गुन्हे दाखल

Sachin Salve | Updated On: Jul 31, 2015 12:07 PM IST

pune dhol31 जुलै : पुण्यात यावर्षीही ढोल ताशे पथक आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाल्याचं दिसून येतंय. नियम धुडकावून सराव करणार्‍या 4 ढोल ताशे पथकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये ढोल ताशा पथकं ही पुण्यातल्या मिरवणुकांची ओळख बनलीये. त्यामुळेच पथकांच्या संख्येमध्येही वाढ होतेय . यामुळेच यंदा गणेशोत्सवाच्या एक महिना आधी या पथकांना सरावांला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ढोल ताशा महासंघानेच ही आचारसंहिता तयार करत ढोलांच्या संख्येवरही मर्यादा घातली होती. पण ही न जुमावता काही पथकांनी सराव सुरू केला आहे. त्याचा त्रास होत असल्याने नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी सराव बंद करत या पथकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पथकांनी मुक वादन करुन याचा निषेध केला. सरावाला किमान दोन महिन्याची गरज असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2015 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close