S M L

शिक्षकानेच केलं विद्यार्थ्याचं अपहरण

Sachin Salve | Updated On: Jul 31, 2015 01:12 PM IST

शिक्षकानेच केलं विद्यार्थ्याचं अपहरण

pune kidnap31 जुलै : पुण्यात शिक्षकानेच विद्यार्थ्याचं अपहरण केल्याची घटना घडलीय. घरी शिकवणी घेणार्‍या शिक्षकाने दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी विद्यार्थाचं अपहरण केलं.

मात्र पोलिसाच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्याकडून मुलाची सुटका करण्यात यश आलंय. दिवेश खैर असं या अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे.

पुण्यातील कल्याणीनगर भागत दिवेश आपल्या कुटुंबीयांसोबत राहतो. दिवेशला शिकवण्यासाठी घरीच एका शिक्षकाची शिकवणी सुरू केली होती.मात्र शिक्षक दिवेशच्या घरी शिकविण्यासाठी मास्क घालून यायचा. वह्या पुस्तकं घेण्याच्या बहाण्यानं शिक्षक दिवेशला घरी घेऊन गेला आणि त्याने दिवेशच्या वडिलांना अपहरण केल्याचं सांगितलं.

आणि दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. दिवेशच्या कुटुंबीयांनी वेळ वाया न घालवता पोलिसांना मुलाचं अपहरण झाल्याची माहिती दिली. अखेर वाघोली येथून दिवेशला सोडविण्यात पोलिसांना यश आल. आरोपी शिक्षक मात्र फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2015 01:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close