S M L

राहुल गांधींचा FTII च्या विद्यार्थ्यांना पाठिंबा

Sachin Salve | Updated On: Jul 31, 2015 01:34 PM IST

राहुल गांधींचा FTII च्या विद्यार्थ्यांना पाठिंबा

31 जुलै : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर घणाघात केलाय. जे एफटीआयआयमध्ये घडतंय तेच इतर संस्थांमध्येही घडतंय, असा आरोप राहुल गांधींनी केला. तसंच भाजपची विचारसरणी मेडियॉक्रिटीला उत्तेजन देत असल्याची टीकाही राहुल यांनी केली.

पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआयच्या संचालकपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आलीये. त्यांच्या नियुक्तीच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी संप पुकारलाय. आज या वादात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली. राहुल यांनी एफटीआयआयमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी संवाद साधला. राहुल यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. भाजपमध्ये एकवाक्यता नाही. जे एफटीआयआयमध्ये घडतंय तेच इतर संस्थांमध्येही घडतंय. संघाच्या विरोधात फक्त काँग्रेसच लढू शकते असं सांगत राहुल यांनी विद्यार्थांची पाठराखण केली.

दरम्यान, राहुल गांधी FTII च्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी दाखल तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केलाय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात FTIIच्या समोर निदर्शनं केली. राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि NSUI चे सदस्य भिडले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2015 01:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close