S M L

पुन्हा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर दरड 'कोंडी'

Sachin Salve | Updated On: Aug 1, 2015 09:35 PM IST

पुन्हा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर दरड 'कोंडी'

01 ऑगस्ट :दोन आठवड्यांपूर्वी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळ्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती आज पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडलीये. खंडाळा घाटाजवळ दरड कोसळ्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर दरड हटवण्यात आली असून मुंबईकडे येणारी वाहतूक सुरळीत सुरू आहे.

19 जुलैला एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळ्यामुळे तब्बल 13 तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर राज्य विकास महामंडळाने एक्स्प्रेस वे रस्ते दुरस्तीचं काम हाती घेतलं होतं. शुक्रवारी हे काम संपलं असं जाहीर करत महामंडळाने ग्रीन सिंग्नल दिला पण आज खंडाळ्या घाटाजवळ पुन्हा एकदा दरड कोसळ्यामुळे दुरस्तीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. ही दरड छोट्या स्वरुपातील असल्यामुळे दरड हटवण्याचं लवकर पार पडलं त्यामुळे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2015 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close