S M L

यंदाचं साहित्यसंमेलन पिंपरी-चिंचवडमध्ये

Samruddha Bhambure | Updated On: Aug 9, 2015 08:08 PM IST

Sahitya-samelan09 ऑगस्ट : 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2016 मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये होणार असल्याची माहीती महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांनी दिली. डी.वाय.पाटील संस्थेकडे संमेलनाचं यजमानपद देण्यात आलं आहे. आज (रविवारी) दुपारी झालेल्या साहित्य महामंडलाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

याआधी बारामतीला संमेलन होणार अशी चर्चा होती. पिंपरी-चिंचवड, श्रीगोंदा, बारामती, उस्मानाबाद, डोंबिवली या स्थळांचा विचार करण्यात आला होता. मात्र अखेर 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2016 मध्ये पिंपरी चिंचवड याठिकाणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, 88वं साहित्य संमेलन पंजाबमधील घुमानमध्ये घेण्यात आलं होतं. संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2015 07:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close