S M L

विम्याच्या पैशासाठी चैतन्यची हत्या, आईने दिली कबुली

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2015 12:06 PM IST

pune_crime43563412 ऑगस्ट : पुण्यातल्या 13 वर्षांच्या चैतन्य बालपांडे खून प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालंय. विम्याचे 2 लाख रुपये मिळवण्यासाठी चैतन्यच्या आईनेच त्याचा खून केल्याच पोलीस तपासात उघड झालंय.

गेल्या आठवड्यात चैतन्यचा खून झाला होता. त्याच्या आईनेच बॅटने मारून त्याचा खून केला होता. तेव्हाच त्याच्या आईला अटकही करण्यात आली होती. चैतन्या आपल्या वडिलांकडे जाण्यासाठी हट्ट करत होता म्हणून त्याच्या आईने बॅटने मारुन खून केला होता. पोलिसांनी त्याच्या आईची उलटतपासणी केली तेव्हा हा खून विम्याच्या रकमेसाठी केल्याचं आईने कबूल केलंय. चैतन्यचा 2 लाख रुपयांचा विमा होता. हा विमा उतरवण्यासाठी त्याच्या आईने हे टोकाचे पाऊल उचलले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2015 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close