S M L

FTII च्या पाचही विद्यार्थ्यांना जामीन

Sachin Salve | Updated On: Aug 19, 2015 07:42 PM IST

FTII च्या पाचही विद्यार्थ्यांना जामीन

19 ऑगस्ट : पुण्यातील एफटीआयआयमध्ये घडलेल्या अटकनाट्यावर आता पडदा पडलाय. पाचही विद्यार्थ्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. 3 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे.

पुण्यातील फिल्म अँड इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII)मध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या अटकनाट्य घडले होते. एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे यांना घेराव घातल्या प्रकरणी 5 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. प्रशांत पाठराबे यांनी सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी पंधराहून अधिक विद्यार्थ्यांविरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यावरुन ही कारवाई करण्यात आलीय.

सोमवारपासून 2008 च्या बॅचच्या प्रकल्प मूल्यांकनाला सुरुवात झाली. प्रोजेक्ट आहे त्या स्थितीत सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेत संचालक प्रशांत पाठराबे यांच्या कार्यालयात तब्बल सहा तास ठिय्या मांडला होता. या अटकनाट्याचे पडसाद उमटले. केंद्रानं या प्रकरणाची दखल घेतलीय. एफटीआयआयचा तिढा सोडवण्यासाठी आता केंद्रानं हस्तक्षेप केलाय. तीन सदस्यीय पथक उद्या एफटीआयआयमध्ये येणार आहे. पथकात डीडी वाहिनीचे महासंचालक एस एम खान यांचा समावेश आहे. काल रात्री नेमकं काय झालं याचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारचं एक पथक पुण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2015 07:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close