S M L

दाभोलकर हत्येच्या तपासासाठी 7 पोलीस अधिकार्‍यांची नियुक्ती

Sachin Salve | Updated On: Aug 20, 2015 05:07 PM IST

दाभोलकर हत्येच्या तपासासाठी 7 पोलीस अधिकार्‍यांची नियुक्ती

20 ऑगस्ट : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रभावी तपासासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाला (सीबीआय) सहाय्य करण्यासाठी राज्याने पोलीस दलातील अधिकार्‍यांची नियुक्ती केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

डॉ.दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासकार्यात पूर्वी काम केलेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या सहाय्याची मागणी सीबीआयने राज्याच्या पोलीस विभागाकडे नुकतीच केली होती. त्याला राज्य सरकारने तातडीने प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार तपासाचा वेग वाढून गुन्हेगारांना लवकर अटक व्हावी यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी त्यास मान्यता दिली आहे. हे अधिकारी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा तपास पूर्ण होईपर्यंत सीबीआयला सहाय्य करणार आहे. यामध्ये पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त जी.एस.मडगुळकर, नागपूरचे पोलीस निरीक्षक सतीश देवरे, यवतमाळचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके, पुण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम आणि सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आदींचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2015 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close