S M L

पुणेकरांना आता एकदिवसाआड पाणीपुरवठा

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2015 05:00 PM IST

पुणेकरांना आता एकदिवसाआड पाणीपुरवठा

04 सप्टेंबर : अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत ढकलला गेलाय. मराठवाड्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झालीये आता दुष्काळाच्या झळा पुण्यालाही सोसाव्या लागणार आहे. पुणेकरांना आता एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. येत्या सोमवारपासून याची अंमलबजवणी सुरू होणार आहे. आज महानगर पालिकेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

पावसाने पाठ फिरवल्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला, पानशेत ,टेमघर व वरसगाव या धरणात केवळ 50 टक्के पाणीसाठा उरला आहे. कमी पावसामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. पाणीचोरी विरोधात भरारी पथके नेमण्याचा आदेश यापूर्वीच पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2015 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close