S M L

गजेंद्र चौहान यांची नियुक्ती रद्द होणार?

Samruddha Bhambure | Updated On: Sep 7, 2015 09:45 AM IST

ftii student3434

पुण्यातील 'फिल्म अण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्य्‌ूट ऑफ इंडिया'च्या वादावर अखेर पडदा पडणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. एफटीआयआयच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार हे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्याविरोधात विद्यार्थी सुमारे तीन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. एफटीआयआयसारख्या देशातल्या नामांकित संस्थेच्या संचालक होण्याची पात्रता गजेंद्र चौहान यांच्यात नाही. त्यांच्या निवडीद्वारे एफटीआयआयमध्ये राजकीय हस्तक्षेप करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. जो कधीही खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. मागच्या महिन्यात या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी केंद्राने एक समिती पाठवली होती. समितीने एफटीआयआयचे संचालक मंडळ आणि आंदोलकांशी चर्चा करून लवकरच वाद मिटवू, असं सांगितलं होतं. अखेर या आंदोलनाला आता यश मिळण्याची चिन्हं दिसत आहेत.

दरम्यान, गजेंद्र चौहान यांच्या जागी प्रसिद्ध दिग्दर्शक राजू हिरानी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरीही एफटीआयआयवर तोडगा निघेल अशी शक्यता मात्र वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2015 09:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close