S M L

धक्कादायक, घरच्या अंगणातच दफन केलं पार्थिव !

Sachin Salve | Updated On: Sep 11, 2015 07:08 PM IST

 धक्कादायक, घरच्या अंगणातच दफन केलं पार्थिव !

11 सप्टेंबर : 'जगण्याने छळले होते...मरणाने केली सुटका...' पण इथं मरणानंतरही वाट्याला छळणंच आलंय. स्मशानभूमीत जागेच्या कमतरतेमुळे एका वृद्ध महिलेचं पार्थिव घराच्या अंगणातच पुरण्यात आला. पुणे जिल्ह्यातल्या देवाची आळंदीमध्ये हा दुर्देवी आणि धक्कादायक प्रकार घडलाय.

कुठल्याही धर्मातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर स्मशानात अंत्यविधी केला जातो, एक तर दफन करून किंवा मुखाग्नी देऊन अंत्यविधी करण्याची प्रथा आहे. इंधनाच्या कमतरतेमुळे अनेक शहरात विद्युतदाहिनीद्वारे प्रेताग्नी दिला जातो तर काही समाजातील परंपरे नुसार, मृत व्यक्तीला दफन करूनच अंत्यसंस्कार केले जातात. मात्र अपुर्‍या जागांमुळे प्रेत गाढायची कुठे ? हा प्रश्न अनेक शहरांसमोरच आवाहन बनलं आहे. देवाची आळंदीमध्येच या गंभीर समस्येचा प्रत्यय आलाय. केवळ स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने एका समाजातील मृत वृद्ध महिलेला घराच्या अंगनातच दफन केल्याची घटना आळंदीमध्ये घडली आहे.

लोकांनी ही स्मशानभूमी साठी जागेची कमतरता असल्याने प्रेताला दफन करण्यासाठी नकार दिला होता. शेवटी प्रेत जास्त वेळ ठेवणं शक्य नसल्याने नातेवाईकांनी घराच्या अंगनातच प्रेत दफन करण्याचा निर्णय घेतला आणि अंत्यसंस्कार आटोपले. मृत्यूनंतर प्रेताची योग्य रीतीने विल्हेवाट न लावणे हा कायद्यानेही गुन्हा आहे. स्मशानासाठी आरक्षित जागा असून ही अशा प्रकारे प्रेताच्या झालेल्या हेळसांडपणाला जबाबदार असणार्‍यावर काही कारवाई केली जाती का? हे बघणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2015 07:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close