S M L

मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प

Sachin Salve | Updated On: Sep 18, 2015 08:16 PM IST

मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प

mumbai pune trian418 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. कामशेत-वडगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं. पाण्यामुळे ट्रॅकखालची खडी वाहून गेली आहे. त्यामुळे दोन्ही मार्गांवरची वाहतूक ठप्प झालीये. पुणे-मुंबई मार्गावरच्या लांब पल्ल्याच्या गाड्या अडकल्या आहे. मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेससह अनेक गाड्या गेल्या काही तासांपासून अडकल्या आहे.

कामशेतमध्ये रस्त्यावर दरड कोसळलीये. त्यामुळे मावळ तालुक्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटला, खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार तलाठी आणि सर्व सर्कल अधिकारी आपआपल्या पथकासह तैनात झाले आहेत. मावळातील ग्रामीण भागातून जाणार्‍या रस्त्यावर दरडी कोसळल्याने एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय.

कामशेतमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं पंचशील आणि इंद्रायणी या कॉलनीमध्ये घरांमध्ये पाणी घुसलंय. गणेशोत्सवामुळं घरांमध्ये गणपतीचं आगमन झालं असताना या पाण्याचं संकट आल्यानं नागरिकांना हालअपेष्टांना पारावार राहिलेला नाही. अजुनही पाऊस सुरूच असल्यानं परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 18, 2015 06:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close