S M L

गणेश विसर्जनात पुणेकर झाले एका दिवसाचे पोलीस अधिकारी !

Sachin Salve | Updated On: Sep 26, 2015 08:44 PM IST

गणेश विसर्जनात पुणेकर झाले एका दिवसाचे पोलीस अधिकारी !

26 सप्टेंबर : पुणे तिथे काय उणे...असं नेहमी म्हटलं जात ते उगाच नाही. उद्या पुण्यात गणेश विसर्जनाची पूर्ण तयारी झालीये. पण पोलीस संख्याबळ पाहत ताण अधिक वाढलाय. त्यामुळे पुणे पोलिसांनी नामी शक्कल लढवत 'एक दिन का पोलिसवाला' तैनात केले आहे. तब्बल एक नाही तर एक हजार ज्येष्ठ नागरिक, कॉलेजचे विद्यार्थी पोलिसाची भूमिका बजावणार आहे.

बघता बघता 10 दिवस कसे गेले आता उद्या बाप्पांना निरोप देण्याची वेळ आलीये. देशात झालेल्या अनेक दहशतवादी कारवाया बघता उद्याचा गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्याचं मोठ आव्हान पोलीस यंत्रणेवर आहे. आधीच संख्याबळ कमी असल्यामुळे आणि कुंभ मेळ्यासारख्या महापर्वाच्या बंदोबस्तासाठी गेल्यामुळे राज्यातील पोलीस यंत्रणेवर उद्याच्या गणेश विसर्जनाचा अधिकच ताण वाढलेला दिसतोय.

मात्र, पुणे पोलिसांनी या वर एक नामी शक्कल लढवलीय. पुणे शहरातील तब्बल 1,000 ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि तरुणीना एका दिवसासाठी पोलीस दलातील विशेष अधिकार बहाल करत त्यांना आता बंदोबस्ताची जबाबदारी दिली आहे. अर्थात यासाठी कायद्यात तरतूद आहे. या विशेष पोलिसांच्या सुचनांचं पालन नागरिकांनी करावं असं आवाहन पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी केलंय.

तर केवळ पोलिसांबरोबरच समाजाची सुरक्षा करणं हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य असल्याचं मानणार्‍या आणि या उपक्रमात आपलं कॉलेज, काम आणि घर सोडून एक दिवसासाठी का होईना आपल्या सेवेचं योगदान देणार्‍या या विशेष पोलीस अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2015 08:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close