S M L

अखेर 'त्या' पिसाळलेल्या कुत्र्याला ठेचून मारले, 45 जणांना घेतला चावा

Sachin Salve | Updated On: Sep 29, 2015 11:20 AM IST

अखेर 'त्या' पिसाळलेल्या कुत्र्याला ठेचून मारले, 45 जणांना घेतला चावा

29 सप्टेंबर : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातल्या मंचर इथं काल सोमवारी सायंकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने 45 लोकांना चावा घेतला. यात लहान मुलांचाही समावेश होता.  रात्री उशिरा या कुत्र्याला इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अखेर दगडाने ठेचून मारलं.

मंचर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने सर्व जखमींवर उपचारासाठी पुण्यातल्या ससून रुग्णालयात रात्री हलवण्यात आलं. अवसरी इथल्या इंजीनियरिंग कॉलेजचे 15 ते 20 विद्यार्थी यात जखमी झाले आहे. त्यातले 25 जण गंभीर जखमी आहेत. रात्री उशिरा या कुत्र्याला इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अखेर दगडाने ठेचून मारलं. कुत्र्याला मारताना शेवटी सुद्धा एका विद्यार्थ्याच्या मांडीलाचा कुत्र्याने जबर चावा घेतला त्यामुळे काही काळ मंचरमध्ये या कुत्र्याबद्दल घबराट पसरली होती मात्र त्याला मारल्या नंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 29, 2015 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close