S M L

पुणे विकास आराखड्यावरुन रणकंदन, काँग्रेस-भाजपचा विरोध

Sachin Salve | Updated On: Sep 30, 2015 11:52 AM IST

पुणे विकास आराखड्यावरुन रणकंदन, काँग्रेस-भाजपचा विरोध

30 सप्टेंबर : पुण्याच्या विकास आराखड्याच्या विरोधी सूर आता निघू लागले आहेत. या विकास आराखड्याला काँग्रेस आणि भाजपने विरोध दर्शवलाय. तसंच सजग नागरिक मंचानेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केलीये.

पुणे शहराचा विकास आराखडा पुणे महापालिकेने वेळेत सादर न केल्याने राज्य सरकारने हा आराखडा 27 मार्च रोजी ताब्यात घेतला. त्यानंतर तीन सदस्यीय समितीने नवा विकास आराखडा सादर केलाय. महापालिका व प्रशासनाने आधी तयार केलेल्या आराखड्यात 35 ते 40 टक्के बदल करण्यात आलेत. विशेषत: शाळा ,मैदान आणि आरोग्यसोयींची अरक्षणं वगळण्यात आलीत. तर निवासी वापरासाठीची जागा 750 हेक्टरने वाढवण्यात आली.

शहरातील लक्ष्मी -शिवाजी -नेहरू व कर्वे रस्ता रुंद करण्याविषयीची तरतूद करण्यात आलीय. काँगे्रस नगरसेवक संजय बालगुडे यांनी प्रतिक्रिया नोंदवताना हा जुन्या पुण्याला देशोधडीला लावण्याचा कट असल्याच म्हटलंय. तर भाजपचे उज्ज्वल केसकर यांनी पुण्याचा हा विकास आराखडा म्हणजे बिल्डर लॉबीचा असल्याचा आरोप केलाय.

याविषयी 'सजग नागरिक मंचा'ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल मत नोंदवलं असून या विकासआराखड्यावरही सूचना मागवण्यात याव्या अशी मागणी करणार असल्याच ते म्हणालेत.

पुण्याच्या नव्या विकास आराखड्यातल्या महत्त्वाचे मुद्दे

1. पेठांमधले मुख्य रस्ते वगळता इतर रस्त्यांचं रुंदीकरण पूर्वीप्रमाणेच ठेवणार

2. हडपसर रेल्वे स्थानकासाठी जादा जागा आरक्षित

3. निवासी क्षेत्रात 750 हेक्टरने वाढ

4. संगमावाडी सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट झोन प्रस्तावित

5. महापालिका क्षेत्रातल्या नद्यांच्या दोन्ही बाजूंचा हरितपट्टा तसाच ठेवण्याची शिफारस

6. मुळा-मुठा नदीची पूर- रेषा सर्व्हे क्रमांकानुसार तयार झाल्यावर डीपीचा भाग होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2015 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close