S M L

'पैशाचा पाऊस फेम' लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Sachin Salve | Updated On: Oct 2, 2015 08:23 AM IST

'पैशाचा पाऊस फेम' लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

02 ऑक्टोबर : पुण्यात पैशाचा पाऊस फेम अधिकारी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. उप-मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव असं या अधिकार्‍याचं नाव आहे. यादव याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. एसआरए कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ही मोठी कारवाई केली.

यादवने एसआरए योजनेतील अपात्र लाभधारकांना पात्र करण्यासाठी आणि प्रार्थना स्थळ अनधिकृत ठरवण्यासाठी 25 लाखांची मागणी केली होती. यापूर्वी त्याने 2 लाखांचा पहिला हप्ताही स्वीकारला होता. उर्वरीत दुसरा 5 लाखांचा हप्ता स्वीकारताना यादव एसीबीच्या जाळ्यात सापडला अशी माहिती एसीबी अधिकारी शिरीष सरदेशपांडेंनी दिली. यावेळी कार्यालयाच्या झडतीही घेण्यात आली असता 3 लाखांची अतिरिक्त रोकड हस्तगत करण्यात आली. यादवांच्या दोन्ही घरांवरही ACB कडून झाडाझडती सुरू आहे. विशेष म्हणजे टीडीआर घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीही यादवला अटक करण्यात आली होती. योगेश सातव यांनी शिरीष यादव विरोधात तक्रार केली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2015 08:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close