S M L

चकण्यासाठी कायपण; सुकामेवा, सिगारेटची 'धूम' स्टाईल लूट !

Sachin Salve | Updated On: Oct 6, 2015 12:37 PM IST

चकण्यासाठी कायपण; सुकामेवा, सिगारेटची 'धूम' स्टाईल लूट !

06 ऑक्टोबर : सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी बाईकस्वारांनी येऊन केल्याच तुम्ही अनेकदा ऐकलं असेल..लाखो रूपयांच्या ऐवजाची हातोहात चोरी करण्याच्या घटना ही तुम्ही ऐकल्या असतील...पण, पुण्यातील कोंढव्यातील व्यापारी त्रस्त झालेत ते चक्क सुका मेवा, कोल्ड्रिंक्स आणि उच्चभ्रू सिगारेटस चोरणार्‍या बाईकस्वारांमुळे...हे चोरटे धूम स्टाईल बाईकवर येऊन सुका मेवा चोरी करून पसार होताय.

घडलेली हकीकत अशी की, पुण्यातील कोंढवा परिसरात सुका मेव्याची दुकानावर दोन तरूण काजू, बदाम घेण्यासाठी आले. एकजण दुचाकीवरच थांबला तर दुसरा दुकानात शिरला. बदामचे 2 किलो पॅकेट त्याने मागितली. पॅकेट हातात येताच त्याने तिथून पळ काढला आणि आपल्या साथीदाराच्या बाईकवर बसून पसारा झाला. दुकानमालकाच्या काही लक्षात येण्याअगोदरच दोन्ही भामटे तिथून पळून गेले. एवढंच नाहीतर पानटपर्‍यांवरही याच पद्धतीने सिगारेटची पाकिटं लुटली गेली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. दुकानदारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पण, पोलीस मात्र अजून या चोराना गजाआड करू शकलेले नाहीत. बरं चोरलेल्या सगळ्याच वस्तू या दारूच्या बैठकीतल्या सोबती ...त्यामुळे हे चोर दारूडे असावेत अशी शंका व्यापार्‍यांनी व्यक्त केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 6, 2015 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close