S M L

पुण्यात गुंडांचा धुडगूस ; वाहनं, दुकानांची तोडफोड

Sachin Salve | Updated On: Oct 10, 2015 02:58 PM IST

पुण्यात गुंडांचा धुडगूस ; वाहनं, दुकानांची तोडफोड

10 ऑक्टोबर : पुण्यातील भोसरी भागातील संत तुकारामनगरमध्ये मध्यरात्री 50-60 जणांच्या टोळक्याने रस्त्यांवरील वाहनांची अंदाधुंद तोडफोड केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालाय.

या तोडफोडीत जवळपास 20-25 दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचं नुकसान झालंय. तर दोन दुकानांचंही नुकसान झालंय. लाठ्या काठ्या, शस्त्र घेऊन या गुंडांनी अक्षरश: रस्तावर धुडगूस घातला होता.

टोळक्याच्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. स्थानिक गुंडाच्या भांडणातून ही तोडफोड झाली असावी. असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी अजूनही कुणाला ताब्यात घेण्यात आलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2015 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close