S M L

पुण्यात पुन्हा जळीतकांड, हडपसरमध्ये दोन दुचाकी जाळल्या

Sachin Salve | Updated On: Oct 23, 2015 04:32 PM IST

 पुण्यात पुन्हा जळीतकांड, हडपसरमध्ये दोन दुचाकी जाळल्या

23 ऑक्टोबर : पुण्यात पुन्हा एकदा वाहन जळीतकांड घडल्याची खळबळजनक घटना घडलीये. हडपसर गाडीतळ परिसरातील उन्नती नगरच्या पार्किंगमध्ये दुचाकी जाळण्यात आल्या. पेट्रोल टाकून दोन गाड्या आणि एक सायकल जाळण्यात आली.

बुरुड समाजाचे पदाधिकारी गोपीनाथ पवार यांच्या मालकीच्या या गाड्या आहेत. यामध्ये एक बुलेट, ऍक्टीव्हा आणि सायकलचा समावेश आहे. यामध्ये या दुचाकी आणि सायकल जळून खाक झाल्या आहेत. या प्रकरणी गोपीनाथ पवार यांनी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांवर आरोप केलाय. तर गणपती मंडळातील वादावरून ही घटना घडल्याचाही संशय व्यक्त करण्यात येतोय. पुढील तपास हडपसरचे पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2015 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close