S M L

मान्य कराच !, संख्याबळानुसार भाजपचा मोठा भाऊ, बापटांचा पलटवार

Sachin Salve | Updated On: Oct 23, 2015 10:27 PM IST

मान्य कराच !, संख्याबळानुसार भाजपचा मोठा भाऊ, बापटांचा पलटवार

23 ऑक्टोबर : गेले काही दिवस सेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगलाय. त्यात आज पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते गिरीष बापट यांनी चांगलीच फोडणी दिली आहे. संख्याबळानुसार भाजप हा मोठा भाऊ आहे, हे आता मान्य करा, असा सल्ला आज बापटांनी दिला.

बापट यांनी संख्याबळाच्या मुद्यावर भाजपच मोठा भाऊ आहे असं वक्तव्य केलं होतं. याचा शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी गिरीष बापट यांच्यावर सडकून टीका केली होती. आम्हीच बाप आहोत असा पलटवार राऊत यांनी केला होता. आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत बापट यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं. 1995 साली सेनेच्या जागा जास्त होत्या, आणि ते आम्हाला लहान भाऊ म्हणायचे, तेव्हा आम्ही विरोध केला नाही. आता त्यांनी विरोध करू नये, असा टोला बापट यांनी लगावला. तसंच शिवसेनेनं आता वास्तव्य स्विकारलं पाहिजे. संख्याबळ पाहिलं तर भाजपचा मोठा भाऊ आहे असा सल्लावजा टोलाही बापटांनी लगावला, तसंच असा वाद शक्यतो टाळला पाहिजे. शिवसेना आणि भाजप एकत्र सरकार चालवत आहे. यापुढे असे वाद टाळले पाहिजे अस मतही त्यांनी नोंदवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2015 10:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close