S M L

महागाईविरोधात राष्ट्रवादी पुन्हा रस्त्यावर, सुप्रिया सुळेंना अटक आणि सुटका

Sachin Salve | Updated On: Oct 26, 2015 02:05 PM IST

महागाईविरोधात राष्ट्रवादी पुन्हा रस्त्यावर, सुप्रिया सुळेंना अटक आणि सुटका

 26 ऑक्टोबर : वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुन्हा एकदा आंदोलन पुकारले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज (सोमवारी) पुण्यात सरकारविरोधात रास्तारोको आंदोलन केलं. महागाईच्या विरोधात हा रास्ता रोको करण्यात आला.

या आंदोलनामुळे लोणी काळभोरजवळ रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलक सुप्रिया सुळेंना काही काळासाठी ताब्यात घेतलं होतं. काही वेळानंतर सुळे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.

तर मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं नेतृत्व सुनील तटकरे यांनी केलं होतं. सीएसटीपासून सुरू झालेला मोर्चा आझाद मैदानात संपला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2015 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close