S M L

पुण्यात 2 फेरीवाल्यांना जिवंत जाळलं, एकाचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Nov 5, 2015 01:04 PM IST

CrimeScene2

05 नोव्हेंबर : लोणावळा - पुणे दरम्यान रेल्वे मध्ये मालाची विक्री करुन उदरनिर्वाह करणार्‍या दोन जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार इथल्या रेल्वे वसाहतीत उघडकीस आला आहे. या दुर्घटनेत अतुलसिंग भदौरिया याचा जागीच मृत्यु झाला तर त्याचा सहकारी सचिन सिंग हा 85% भाजला आहे. त्याला पुण्यातील ससुन रुग्णालयात दाखल केलं असुन तो मृत्युशी झुंज देत आहे.

अतुलसिंग भदौरिया आणि सचिन सिंग हे दोघेही इथल्या रेल्वे वसाहतीत भाड्याने खोली घेवून राहत होते. काल (बुधवारी) पहाटे अज्ञत व्यक्तिने त्यांच्यावर पेट्रोल टाकुन त्याना पेटवलं. या घटनेमागील निश्चित कारण अद्याप समजले नसून काही दिवसांपुर्वीच्या दोघांचा त्यांच्या सहकार्‍यांशी वाद झाला होता. यातुनच हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2015 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close