S M L

बापटांच्या पुण्यातच डाळ मिळेना 100 रुपये किलो !

Sachin Salve | Updated On: Nov 6, 2015 05:48 PM IST

बापटांच्या पुण्यातच डाळ मिळेना 100 रुपये किलो !

06 नोव्हेंबर : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी 100 रुपये डाळ देऊ अशी घोषणा केली खरी पण ज्या पुण्याचे ते पालकमंत्री आहेत त्या पुणे शहर आणि परिसरात मात्र डाळ 100 रुपयांनी मिळणार नाही हे स्पष्ट झालंय.

सध्या पुण्यात डाळीचे होलसेलला 160 रुपये तर किरकोळ विक्रीसाठी 180 रुपये आहे. कारण शहर आणि जिल्ह्यात डाळीचा अतिरीक्त साठा सापडलाच नाही, पुण्यात डाळीचा कोणतीही साठेबाजी झालेली नाही असं पुरवठा विभागानंच स्पष्ट केलंय.

तसंच डाळीचा साठा करणार्‍या एकाही व्यापार्‍याला मोक्का लागलेला नाही आणि ज्यांच्याकडून डाळ जप्त केले हेती, ती जप्त केलेली डाळ व्यापार्‍यांना परत केली यामागे काय गौडबंगाल आहे असा प्रश्न व्यापारी विचारत आहे. पुण्याप्रमाणेच औरंगाबादमध्येही 100 रुपये किलोने डाळ विकली जाणं शक्य नसल्याचं व्यापार्‍यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2015 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close