S M L

कात्रज-देहूरोड बायपासवर भीषण अपघात; 4 ठार

Samruddha Bhambure | Updated On: Nov 15, 2015 05:31 PM IST

कात्रज-देहूरोड बायपासवर भीषण अपघात; 4 ठार

15  नोव्हेंबर : कात्रज-देहुरोड बायपास महामार्गावर भरधाव खासगी बस दुभाजक तोडून विरूद्ध दिशेच्या लेनवरील दोन दुचाकींना धडकली. या भीषण अपघातात चारजण ठार झाले. वारजे परिसरातील फन की जवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला.

कात्रज देहूरोडवर कोल्हापूरहून मुंबईकडे जाणार्‍या खासगी बसचे नियंत्रण सुटलं आणि बसने दुभाजक तोडलं आणि विरुद्ध दिशेने येणार्‍या दोन दुचाकींना जाऊन धडकली. त्यात दुचाकीवरील तीनजणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमी व्यक्तीला स्थानिकांनी तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून या मार्गाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. मात्र, तरीही राज्य सरकारकडून रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदार कंपनीवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. याबद्दल नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2015 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close