S M L

दारू पार्टी पडली महागात, तलावात बुडून दोघांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Nov 22, 2015 04:31 PM IST

दारू पार्टी पडली महागात, तलावात बुडून दोघांचा मृत्यू

२२ नोव्हेंबर - पुण्याजवळच्या दिवे घाटातल्या मस्तानी तलावात बुडून दोघांचा मृत्यू झालाय. तर तिघांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालंय.

मस्तानी तलावाच्या काठावर पाच जणांनी मिळून दारुपार्टी केली. या पार्टीत दारू जास्त प्यायल्यानं पाण्यात पडून बुडून दोघांचा मृत्यू झालाय. बाकीचे 3 जण सुरक्षित आहेत अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मृतांमधल्या सुनील गायकवाड या तरुणाचा सहभाग आहे. सुनील गायकवाडचं पाचच दिवसांनी लग्न होतं. हे सर्व तरुण अंदाजे 20-25 या वयोगटातले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2015 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close